अन अमृतमहोत्सव वर्षात चावडी समोर फडकला तिरंगा
🔸जानकाईपोड येथे ध्वजारोहण , सामूहिक राष्ट्रगीत व हर घर तिरंगा..
🔸समाजकल्याण अधिकारी डॉ.सचिन मडावी यांचा पुढाकार , राहुल आत्राम यांची प्रमुख उपस्थिती
मारेगाव : प्रतिनिधी
स्वतंत्र मिळून 75 वर्ष पूर्ण झाले मात्र अजूनही आदिवासी समाज मूलभूत सोयीसुविधेपासून कोसो दूर आहे. मात्र तरीदेखील कसलीही तक्रार न करता आदिवासी समाज हळू हळू विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा जोरकस प्रयत्न करित आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त मारेगाव तालुक्यातील जानकाई या अतिमागास आदिवासी कोलाम पोडावर जिथे जायला चांगला रस्ता नाही , पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था नाही तरी देखील कसलीही तक्रार न करता समाज कल्याण अधिकारी डॉ.सचिन मडावी यांच्या पुढाकारातून प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यात आला.तसेच पोडाच्या मध्यभागी असलेल्या चावडी वर पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून सामूहिक झेंडावंदन आणि राष्ट्रगीत घेण्यात आले.
यावेळी श्री.राहुल आत्राम अध्यक्ष कोलाम संघटना, श्री. पैकुजि आत्राम सर,श्री.वासुदेव टेकाम सर ,पोलीस पाटील नाईक महाजन घट्या कारभारी बालाजी टेकाम , राजू टेकाम , गुलाब टेकाम , पिंटू आत्राम , कल्पना जांभुळकर , गिरीजा टेकाम , टेकाम सर , शशिकला आत्राम , आदींनी पुढाकार घेऊन गावातील सर्व लोकांना एकत्र आणले.
अपुऱ्या सुविधा असतानाही कसलीही तक्रार न करता देशाच्या अमृत महोत्सवात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविणाऱ्या आदिवासी समाजाचे वैशिष्ट यानिमित्ताने देशभक्तीचे ओतपोत मनोबल वाढविले.