मारेगावात स्वच्छता दूतांचा गौरव
🔸स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य
🔸मारेगाव तालुका भाजप व युवा मोर्चा चा पुढाकार
मारेगाव शहर अधिकाधिक स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी भल्यापहाटे पासून स्वच्छतेची कास पकडणाऱ्या सफाई कामगारांचा पुरुषांना पोशाख व महिलांना साडी चोळी सह शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
स्थानिक नियोजित पेट्रोल पंप प्रांगणात घेण्यात आलेल्या गौरव कार्यक्रमात मारेगाव नगरपंचायतच्या अधिनस्थ असलेल्या जवळपास १८ सफाई कामगारांचे मनोबल उंचावण्यासाठी गौरव करण्यात आला . यात किमान १४ पुरुष सफाई कामगार यांना पोशाख देत व चार महिला सफाई कामगारांना साडी चोळी आणि शाल श्रीफळ देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
आमदार संजीवरेड्डी बोदकूलवार यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की , वणी येथील माजी सभापती संजय पिंपळशेंडे ,तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे , जिल्हा सरचिटणीस शंकर लालसरे ,शशिकांत आंबटकर , नगरपंचायत उपाध्यक्ष हर्षा महाकुलकार ,प्रशांत नांदे , प्रसाद ढवस , विलास चिंचुलकर , नगरसेवक वैभव पवार , राहुल राठोड , सुशिला भादीकर , अनुप महाकुलकार , गणेश झाडे महिला आघाडी अध्यक्ष सुनीता पांढरे , शारदा पांडे , ताई खिरटकर आदींची यावेळी उपस्थिती होती.