मारेगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न
🔸साई मित्रपरिवार तर्फे आयोजित
🔸91 रक्तदात्यांनी केलें रक्तदान
मारेगाव:- प्रतिनिधी
येथील साई मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त करण्यात आले होते. यावेळी 91 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले. सदर रक्तदान शिबिर जगन्नाथ महाराज मंदिर येथे संपन्न झाले.
कोणतेही रसायन अथवा औषधी मानवी रक्ताला पर्याय ठरू शकत नसल्याचे सामजिक भान जपणाऱ्या साई मित्र परिवारातर्फे 15 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी 91 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना साई प्रतिमा भेट देण्यात आली.सदर रक्तदान शिबिराला वसंतराव नाईक वैद्यकीय शासकीय रक्तपेढी यवतमाळ येथील डॉक्टरांच्या चमूने सहकार्य केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी करिता साई मित्र परिवाराच्या सर्व सभासदांनी सहकार्य केले.