मागणी...
दिव्यांग निधी तात्काळ वाटप करण्यात यावा
🔸मारेगाव तालुका दिव्यांग जनक्रांती संघटना
🔸स्थानिक प्रशासनाला साकडे
वेगाव : राजू पिपराडे
ग्रामपंचायत स्तरावर वाटप करण्यात येणारा दिव्यांग निधी लेटलतीफ कर्मचाऱ्यामुळे रेंगाळला आहे. दिव्यांगांना पाच टक्के निधी प्रदान करण्याची तरतूद असतांना कमालीच्या विलंबाने दिव्यांग वंचित आहे त्यामुळे तात्काळ निधी वाटप करण्यात येऊन दिलासा द्यावा अन्यथा नाईलाजाने आंदोलनाला सामोर जाण्याचा इशारा मारेगाव तालुका दिव्यांग जनक्रांती संघटनेने स्थानिक प्रशासनास दिला आहे.
केंद्र सरकारने पारित केलेल्या दिव्यांग व्यक्तींना समान संधी , हक्काचे संरक्षण अधिनियमानुसार दिव्यांगांचे जीवनमान उंचविण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे.मात्र मारेगाव तालुक्यातील काही ग्रामपंचायतीने दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि पुनर्वसनासाठीच्या एकूण निधी पैकी पाच टक्के निधी दिव्यांगासाठी प्रदान करावा.सन २०२०- २१ या आर्थिक वर्षात तालुक्यातील काही ग्रामपंचायत मध्ये हा निधी वाटप करण्यात आला असून उर्वरित ग्रामपंचायतीने हा निधी तात्काळ जमा करून दिव्यांगांच्या खात्यात वळता करावा.
अन्यथा नाईलाजाने आंदोलन छेडून न्यायिक मागणी पूर्णत्वास नेऊ अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.सदरील मागणीचे निवेदन संघटनेचे पदाधिकारी राहुल कोटे , श्रीकांत पवार , गुणवंत मडावी यांच्यासह सदस्यांनी स्थानिक गटविकास अधिकारी गोपाल कल्लारे यांना दिले आहे.