नरसाळा येथील ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण माजी सैनिकाच्या हस्ते
🔸गावकऱ्यांनी सर्वाप्रती व्यक्त केली सदभावना
मारेगाव तालुक्यातील नरसाळा ही पेसा ग्रामपंचायत असून येथील सरपंच श्री.संगीत मरस्कोल्हे हे आहेत .स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी निमित्य या वर्षी १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत राष्ट्र ध्वजारोहन करून व विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.
नरसाळा येथील सरपंच श्री. संगीत मरस्कोल्हे यांनी ह्या या स्वातंत्राच्या अमृत महोत्सवा निमित्य राष्ट्र ध्वजारोहनाचा बहुमान येथील उपसरपंच श्री.यादवराव पांडे यांना १३ ऑगस्ट, येथील ग्रामपंचायत सदस्या सौ. शारदा पांडे यांना १४ ऑगस्ट व सरपंच यांनी स्वेच्छेने १५ ऑगस्ट चा ध्वजारोहणाचा बहुमान नरसाळा येथील माजी सैनिक श्री.अशोक गौरकर यांना देवून गावाकऱ्यात सर्वाप्रती सदभावांना, प्रेम,व आदर्श असल्याचे त्याचे मत दाखवून दिलेयत.
नरसाळा ग्रामपंचायत मध्ये आज पर्यंत अनेक पदाधिकारी आलेत मात्र एकही पदाधिकाऱ्यांनी आज पर्यंत ध्वजारोहणाचा बहुमान गावातील दुसऱ्या कोणालाही दिल्याचे बहुदा ऐकविण्यात नाहीत. पाहिले नाहीत.पण मात्र विद्यमान सरपंच यांनी अमृतमहोत्सव या तीनही दिवसाचा ध्वजारोहणाचा बहुमान दुसऱ्यास देवून गावाकऱ्याचे मन जिंकले.माजी सैनिकांचे मनोबल वाढविले आहेत.सरपंच यांच्या या कार्या बद्दल ग्रामस्थांत एकोप्याची चर्चा होतांना दिसत आहेत.
सरपंच हे आपले मत व्यक्त करतांना बोलले की , माझ्या ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठा करणारे कर्मचारी हे गावाकऱ्यांना पाण्याची कमतरता पडू नयेत म्हणून रात्री,दिवसा अहोरात्र मेहनत करताना दिसतात.मी माझा समोरील ध्वजारोहणाचा बहुमान मी माझ्या कर्मचाऱ्याला देईल तेव्हाच मला समाधान वाटेल असे भावनिक मत व्यक्त केले.या वरून ग्रामपंचायत कर्मचाऱ्या विषयी त्याचा मनात असलेले प्रेम,आदर दिसून आलात.या स्वातंत्र अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन येथील ग्रामसेवक सचिन पाटील यांनी केले असून या कार्यक्रमाला येथील सरपंच श्री.संगीत मरस्कोल्हे,उपसरपंच यादवराव पांडे,शारदा पांडे,पुष्पा भुसारी,धनंजय तोडसे,कोंडूबाई कनाके,चंद्रकला किनाके,जिल्हा परिषद शाळेतील मुख्यध्यापिका निर्मला रोगे,चिडे सर,पेसा कोष समितीच्या सदस्या उज्वला मडावी ,बाळू सुरपाम, आरोग्य विभागाच्या कनाके मॅडम,कोलूरी आरोग्य कर्मचारी,येथील तलाठी थिटे साहेब,कोतवाल संदिप् कुळसंगे व या कार्यक्रमाचे आयोजन करणारे येथील ग्रामपंचायत कर्मचारी मारोती कोहळे, गोपाळ उईके आणी शाळेतील विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते.