धक्कादायक...
मिठाचे पाणी पाजल्याने सर्जा राजाचा करून अंत
🔸ऐन पोळ्याच्या सणावर शेतकऱ्यावर संकट
🔸कोलगाव येथील घटना
मारेगाव : प्रतिनिधी
वर्षभर काबाडकष्ठ करून पशुधना बाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण ऐन काही तासांवर असतांना शेतमालकाने सर्जा राजा ला मिठाचे पाणी पाजल्याने बैलजोडीचा करून अंत झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.
अलीकडच्या बदलत्या वातावरणाने पशुधन वैरण करण्यास मज्जाव करीत आहे.चारा खात नसल्याने गावरान इलाज म्हणून मारेगाव तालुक्यांतील कोलगाव येथील सुरेंद्र गारघाटे यांनी दि.२४ ऑगष्ठ रोजी गुरुवारला स्वतःच्या मालकीचे असलेल्या बैलजोडीला मीठाचे पाजले हा इलाज सर्जा राजाच्या अंगलट येत किमान सव्वा लाख रुपये किंमत असलेल्या बैलजोडीचा दुर्देवी मृत्यू झाला.
तूर्तास डवरणी , खुरपणीचे दिवस त्यातच पोशिंद्याच्या संगतीला वर्षभर काबाडकष्ठ करून सर्जा राजा बाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा पोळा हा सण काही तासांवर असतांना सर्जा राजाच्या मृत्यूने शेतकऱ्यांत हळहळ व्यक्त होत आहे.
वेगवेगळ्या चर्चेला उधाण
पोळा सणाच्या मुहूर्तावर सर्जा राजाला मृत्यूने कवटाळले असतांना सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.मात्र केवळ मिठाच्या पाण्याने झालेल्या नुकसानीची कोलगावात वेगवेगळे तर्क लावल्या जात आहे.परिणामी मिठाच्या पाण्याची शेतकऱ्यांत दहशत पसरली आहे.किंबहुना मिठाच्या पाण्याऐवजी युरियाचे पाणी तर नसेल ना ? अशीही चर्चा जोर पकडत आहे.