आत्महत्येची धग
तरुण शेतकऱ्याने घेतले विष
वणी :- बातमीदार
तालुक्यात तिन वेगवेगळ्या घटनेत तिन दिवसात तिन अविवाहित तरुणांनी आपले जिवन संपविल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात चिंतेचे सावट पसरले आहे.तालुक्यातील मौजा डोर्ली येथील रहीवासी असलेले योगेश्वर विठ्ठल थेरे (२२) या अविवाहित तरुण शेतकर्याने दिनांक २० ऑगस्ट ला शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मौजा येनक शिवारात विष घेउन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतकाच्या व त्यांच्या आईच्या नावे मौजा डोर्ली येथे शेतजमीन आहे.
तरुण शेतकर्याने असे टोकाचे पाउल का उचलले हे मात्र कडू शकले नाही.