आत्महत्येची धग..
वेगाव येथील युवकाने घेतले विष
🔸चंद्रपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू.
🔸मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील घटना.
मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील २८ वर्षीय युवकाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक २० ऑगस्ट रोजी शनिवारला पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
तालुक्यातील आत्महत्येची धग कायम असतांना वेगाव येथील अविनाश जीवन मेश्राम वय सुमारे २८ वर्ष रा.वेगाव असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून मिळालेल्या माहिती नुसार अविनाश जीवन मेश्राम यांने शुक्रवारला रात्री आठ वाजताचे दरम्यान स्वगृही विषारी औषध प्राशन केल्याची माहिती त्यांच्या कुटबियांना मिळताच कुटुंबियांनी तातडीने उपचारांसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे स्थलांतरीत करण्यात आले होते. पण काही तास नंतर उपचारा दरम्यान चंद्रपूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. अविनाश यांच्या पश्चात आई,वडील,एक मोठा भाऊ,असा आप्त परिवार आहे.त्याच्या आत्महत्येचे कारण अजुन अस्पष्ट आहे.पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहेत.