मारेगाव बसस्थानका साठी महिलांचे आमरण उपोषण
🔸तहसील कार्यालयासमोर रविवार पासून आंदोलनाला सुरुवात
मारेगाव बसथांबा उभारणीचे भिजत घोंगडे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोर जावे लागत आहे.बसथांबा उभारणीसाठी आता भाकपच्या दोन महिलांनी कंबर कसली असून रविवार पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
मारेगाव राज्य महामार्गा शेजारी असलेल्या जागेवर बसस्थानक उभारणीसाठी अनेक सामाजिक , राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.त्यासाठी २७४० चौ. मी. जागेची उपलब्धता मिळाली.
मात्र , सदरील जागेवर बसथांबा उभारणीचे भिजत घोंगडे कायम आहे.अजूनही बसथांबा उभारणीसाठी मुहूर्त मिळत नसल्याने प्रवाशांचे बेहाल ही नित्याची बाब ठरत आहे.लोकप्रतिनिधीनी तात्काळ दखल घेऊन मारेगाव करिता संवेदनशील बनलेला हा प्रश्न मार्गी लावावा.अशी जनतेकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.
परिणामी , बसथांबा चा प्रश्न मार्गी लागत नाही तोवर आमरण उपोषण कायम ठेवण्यासाठी दि.१४ ऑगस्ट पासून मारेगाव तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महिला पदाधिकारी लता रामटेके व रंजना टेकाम यांनी स्थानिक तहसील कार्यालय समोर भर पावसात आमरण उपोषण सुरू केले आहे.किंबहुना ग्रामीण भागातील भाकपच्या पदाधिकारी असलेल्या दोन महिलांनी सुरू केलेल्या उपोषणाचे नेमके काय फलित निघते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
तहसीलदार यांची उपोषण स्थळी भेट
आज दुसऱ्या दिवसात उपोषण मंडपास तहसीलदार दीपक पुंडे व नायब तहसीलदार भगत यांनी भेट दिली.भाकपचे जिल्हा सचिव बंडू गोलर यांचेशी बसथांबा उभारणीबाबत सांगोपांग चर्चा केली.मात्र वरिष्ठ प्रशासकीय विभागाचा हा विषय असल्याने यावर लोकप्रतिनिधी ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.त्यामुळेच उपोषण कर्त्या महिलांनी हा हक्क आम्ही मिळवूनच आंदोलन मागे घेण्याची भूमिका मांडली.