अतिक्रमण हटविण्यासाठी उपोषणाचा ईशारा
🔸️खुद्द नगरसेवकाने थोपटले दंड
🔸️नगरपंचायत प्रशासना बेताल कारभार चा परिपाक
येथील प्रभाग क्रमांक १३ मधील दुकान हटविण्याच्या मागणीसाठी वारंवार तक्रार देऊनही हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणाऱ्या नगरपंचायत विरोधात आता थेट नगरसेवकानेच दंड थोपटले असून येत्या १५ जून पासून नगरपंचायत कार्यालय समोर आमरण उपोषणाचा एल्गार पुकारला आहे.
येथील प्रभागातील तेरा मधील राज्य महामार्गा नजीक असलेल्या टाईल्स दुकानामुळे ऐन पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह दुकानाला अडत लोकांच्या घरात शिरत असल्याचा दर वर्षाला असह्य त्रास सहन करावा लागतो आहे.त्यामुळे घरात सरपटणारे प्राणी व आजारपण हे नशिबाला चिकटले असल्याचा आरोप येथील नागरिकांचा आहे.
डॉ. मनिष मस्की
नगराध्यक्ष , मारेगाव
या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही गंभीर बाबीकडे स्थानिक प्रशासन कमालीचे दुर्लक्ष करीत असल्याचाही आरोप होत आहे.दरम्यान तक्रारीला केराची टोपली दाखविण्यात येत आहे.तक्रारीची गंभीर दखल घेण्यात सपशेल असमर्थ ठरलेल्या प्रशासनाविरोधात आता येथील नगरसेवक अनिल गेडाम यांनी दंड थोपटले असून थेट न्याय मागण्यासाठी येत्या १५ जून पासून नगरपंचायत कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याचा एल्गार पुकारला आहे.
प्रभागातील नागरिकांच्या न्यायिक मागणीसाठी माझा लढा आहे.सदर दुकान अतिक्रमित आहे त्यामुळे भर पावसाळ्यात नागरिकांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरत आहे.नागरिकांच्या मूलभूत गरजेला न्याय मिळेपर्यंत मी माघार घेणार नाही.उपोषण दरम्यान माझ्या जिवितास हानी झाल्यास स्थानिक प्रशासन जबाबदार राहील.
अनिल गेडाम
मनसे नगरसेवक
मारेगाव
सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजेकडे कायम दुर्लक्ष करून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्याधिकारी , नगराध्यक्ष यांच्या विरोधात आता खुद्द नगरसेवक यांना आंदोलन करावे लागत असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून नगरपंचायत प्रशासन विकास कामाबाबत किती गंभीर आहे हे दिसून येत आहे.नगरपंचायत प्रशासनाचे यानिमित्ताने लक्तरे वेशीवर टांगल्या जात आहे.
राहुल जयस्वाल
संचालक
कविता टाईल्स , मारेगाव