शिवनाळा शाखा प्रमुख राहुल आत्राम यांचा मनसेला 'जयमहाराष्ट्र'
मारेगाव : प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील शंभरटक्के कोलाम समाज असलेल्या शिवनाळा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा प्रमुख तथा विभागीय अध्यक्ष राहुल आत्राम यांनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांना सुपूर्द केला.
मनसेच्या स्थापने पासून पक्षात सक्रिय व निष्ठेने कार्य करणाऱ्या राहुल आत्राम यांनी तालुका पदाधिकारी यांच्या निष्क्रियतेवर ठपका ठेवला आहे. पक्ष संघटनेकडे कमालीचे दुर्लक्ष करीत राजकिय कार्यात काहीं निवडकांना जाणीवपूर्वक डावलल्या जात असल्याचा आरोप करीत आत्राम यांनी राजीनामा दिला आहे.
दरम्यान शाखा प्रमुख , विभागीय अध्यक्ष तथा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांचेकडे पाठविला आहे.या राजीनामाने आदिवासी समाजातील युवकाच्या पक्षत्यागाने विभागात पक्षाला खिंडार पडल्याचे बोलले जात आहे.