खेकडवाई येथील संशायित आरोपी गजाआड
मारेगाव : - प्रतिनिधीतालुक्यातील खेकडवाई येथील युवकाने येथील युवतीला लग्नाचे आमिष दाखवीत लैंगिक अत्याचार केला.लग्नास नकार देणाऱ्या संशायित आरोपी विरुद्ध मारेगाव पोलिसांत तक्रार दाखल करताच अटक करण्यात आली.
विलास मनोहर रामपुरे (२७)रा.खेकडवाई असे संशायिताचे नाव आहे.येथीलच २९ वर्षीय युवतीसोबत गेल्या चार वर्षांपासून सूत जुळले होते.अशातच लग्नाच्या आणाभाका घेत पिडितेचे सातत्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान पिडितेने चतुर्भुज होण्याचा तगादा लावला मात्र संशायिताने चक्क दुसरीकडे साक्षगंध उरकविले.त्यामुळे पिडीत युवतीचा असंतोष शिगेला पोहचला आणि थेट पोलिसात तक्रार दाखल केली.त्यानुसार संशायित आरोपी विलास रामपुरे यांचेवर कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.