दिग्रस :- प्रतिनिधी
मोक्षधाम सेवा समितीच्या सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी व दिग्रस शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी आज मोक्षधाम परिसरातील स्वच्छता अभियान राबवून श्रमदान केले दिवसेंदिवस परिसराची स्वच्छता रंगरंगोटी आणि सुधारणा वाढत आहे आपणा सर्व बंधूंना विनंती की या ईश्वरीय कार्यात सदैव योगदान द्यावे आणि मोक्षधाम चे वैभव वाढविण्यास सहकार्य करावे
तसेच एक मार्चला महाशिवरात्री उत्सवा निमित्त उद्यापासून कार्यक्रमास सुरुवात होत आहे आणि दोन तारखेला महाप्रसाद आयोजित केलेला आहे या प्रसंगी आपणा सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणी सर्वांनी सहकार्य करावे असे आव्हान मोक्षधाम सेवा समितीच्या वतीने केले आहे.