युवकाने चक्क पेट्रोलने घेतले जाळून!
🔸पांढरकवडा (पिसगाव)येथील घटना🔸आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
मारेगाव : प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा येथील युवकाने चक्क पेट्रोल अंगावर घेत जाळून घेतल्याची घटना शुक्रवारला सायंकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान घडली. तालुक्यात आत्महत्येची धग कायम असतांना जीवनयात्रा संपविण्यासाठी आता चक्क पेट्रोलचा उपयोग होत असल्याने तालुक्यात भयावह स्थिती निर्माण होत आहे.
अनुप अरविंद आस्वले (२३) रा.पांढरकवडा असे पेट्रोलने जाळून जीवनयात्रा संपविलेल्या युवकाचे नाव आहे.आज सायंकाळच्या सुमारास सदर युवकाने पेट्रोल अंगावर टाकून स्वतः पेटवून घेतले यात तो जवळपास ८० टक्के जळाला व त्याचा करून अंत झाला.
आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.आत्महत्या केलेल्या युवकाच्या पश्चात आई , वडील व एक भाऊ असा आप्तपरिवार आहे.