वृद्धाची गळफास लावून आत्महत्या
🔸कोसारा येथील घटना🔸दारिद्रयाला कंटाळून जीवनयात्रा संपविल्याचा कयास
तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कोसारा येथील एका साठ वर्षीय इसमाने स्वतःचे घरी गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना आज रविवारला दुपारी २ वाजताचे सुमारास उघडकीस आली.तालुक्यात आत्महत्येची मालिका कायम असतांना जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे.
सुधाकर विठोबा महाजन असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. मागील अनेक वर्षांपासून ते एकटेच जीवन कंठीत होते.वार्धक्यात कोणतेही कामे होत नसल्याने त्यांचा जगण्याचा तोडका आधार निराधार बनला होता.यातच त्यांना काही व्याध्यानी ग्रासले होते.दारिद्र्याचे प्रचंड चटके सोसत अखेर सुधाकर यांनी जीवनाचा शेवट केला.घर शेजाऱ्यांनी दरवाजा उघडताच ही दुर्देवी घटना उघडकीस आली.दरम्यान त्यांची इतर कौटुंबिक माहिती वृत्त लिहिपर्यंत प्राप्त होवू शकली नाही.
मागील वर्षभरापासून मारेगाव तालुक्याला आत्महत्येचे ग्रहण लागले आहे.दोन चार दिवसाआड होणाऱ्या आत्महत्येची मारेगाव तालुका प्रभावित होत आहे.