दिव्यांगांना निधी वाटप करण्याकरिता गट विकास अधिकारी यांना निवेदन
🔹दिव्यांग जनक्रांती संघटनेचा पुढाकार
तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय अंतर्गत येत असलेल्या सर्व ग्रामपंचायतीनी दिव्यांग व्यक्तीच्या कल्याण व पुनर्वसन साठी एकूण निधी पैकी पाच टक्के निधी राखून ठेवावा व तो निधी अपंग व्यक्तीच्या बँक खात्यात मध्ये थेट जमा करावा तसेच पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यात यावा व दिव्यांग व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता योग्य ती कारवाई करावी तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांनी राखून ठेवलेला निधी त्वरित वाटप करण्यात यावा करिता दिव्यांग जनक्रांती संघटनेने गटविकास अधिकारी पंचायत समिती मारेगाव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष राहुल ,महिला तालुकाध्यक्ष वैशाली ताजणे, नितेश ढवस,गुणवंत मडावी, अतुल जुमनाके,राणी सुर,प्रगती फरकाडे, साक्षी मोरे,कांत पवार,विनोद ठाकरे,निलेश मोहकर,रवींद्र आत्राम व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
केंद्र शासनाने पारित केलेल्या दिव्यांग व्यक्तींना समान संधी हक्काचे संरक्षण व संपूर्ण सहभाग अधिनियम 1995 व दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मध्ये दिव्यांग यांचे जीवन सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्व तोपरी प्रयत्न करीत आहे.