आत्महत्येची धग...
सगणापूर येथे महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील सगणापूर येथील साठ वर्षीय वृद्ध महिलेने स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना आज मंगळवारला दुपारी तीन वाजताचे दरम्यान उघडकीस आली.
सुमन दिनकर चौधरी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून ती बऱ्याच दिवसापासून शेतात गेलेली नव्हती.मात्र शेजारच्या महिलांना आज शेतात जाऊन हरभरा पाहून येते म्हणून सांगत होती.त्यानुसार आज शेतात गेली.शेतातील विहिरीत तिने आत्महत्या केल्याची दुर्देवी बाब दुपारी तीन वाजताचे दरम्यान उघडकीस आली.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.मृतक सुमन हिच्या पश्चात विवाहित दोन मुले व दोन मुली सह नातवंड आहे.