शिंगाळा व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले
मुकुटबन : संजय लेडांगे
येथिल ब्रिटिशकालीन तलावातील शिंगाळा चवीसाठी दूरदूर प्रसिद्ध आहेत. यावर्षी ऑक्टोबर महिन्यातच शिंगाळा निघायला सुरवात होऊन, विक्रीसाठी बाजारात दाखल होत आहेत.शिवाय शिंगाळा व्यवसाय सध्या जोर धरत व्यासायिकांनी व्यवसाय थाटला आहेत. परिणामी शिंगाळा व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेले दिसू लागले आहेत. मुकुटबन ब्रिटिशकालीन तलाव साधारणतः तीनशे हेक्टर जंगलव्याप्त परिसरात पसरलेला आहेत.तलावात विविध प्रजातीचे पक्षी पहावयास मिळते.या निसर्गरम्य तलावावर मासोळी, शिंगाळा आणि कमळाच्या फुलाचा व्यवसाय दरवर्षी अधिक चालतो. अशा नैसर्गिक सौदर्याने नटलेल्या तलावावर व्यासायिकदृष्ट्या तीनशे-चारशे व्यावसायिक कुटुंब अवलंबून, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
ब्रिटिशकालीन तलावातील शिंगाळा चवीसाठी प्रसिद्ध आहेत. नागपूर, चंद्रपूर, अदीलाबाद, वरोरा आणी यवतमाळ या शहरासह विविध राज्यातही शिंगाळ्याची अधिक मागणी आहेत. परंतु तलावातील मासोळीची संख्या वाढल्याने, त्याचा परिणाम शिंगाळा वेलावर होऊन वेल मासोळीने फस्त केली आहेत. परिणामी यावर्षी शिंगाळा उत्पादनात मोठी घट झाल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.स्थानिक व बाहेरील शिंगाळा व्यावसायिक तलावावर खरेदीसाठी हजेरी लावतांना दिसतात. तलावातील शिंगाळा विक्रीसाठी बाजारात दाखल होताच, शिंगाळा व्यावसायिक जोमात व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागला आहेत. परिणामी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलू लागले आहेत.