Type Here to Get Search Results !

आदिवासी मानव विकास आयुक्तांची वनधन केंद्रांना भेट

आदिवासी मानव विकास आयुक्तांची वनधन केंद्रांना भेट

🔸आयुक्तांची विविधांगी विषयावर शेतकऱ्यासोबत चर्चा

मारेगाव : प्रतिनिधी
मारेगाव आणि केळापूर तालुक्यातील अदिवासी भागांमध्ये चालणाऱ्या वनधन केंद्राना आदिवासी मानव विकास आयुक्त नितीन पाटील यांनी वनधन केंद्रांना भेट देऊन चालणाऱ्या वनधन केंद्रांबाबत माहिती जाणून घेतली.
सिंगलदिप येथे भेट दिली असता सिंगलदिप येथील ग्रामस्थ आणि सरपंच अनिल सूर्यभान आत्राम यांनी नितीन पाटील आणि शबरी महामंडळ, यवतमाळ येथील दादा अडावतकर यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. दीनदयाल बहुउद्देशीय विकास संस्था यवतमाळच्या प्रेरणेने सुरु झालेल्या वनधन केंद्रांची माहिती जाणून घेताना सुरु असलेल्या काही प्रयोगाची पाहणी आणि शेतकरी त्याचा उपयोग शेतांवर कशा पद्धतीने करतो, कोणते औषध कुठल्या पिकांवर उपयोगी आहे, याचीही माहिती त्यांनी उत्सुकतेनी जाणून घेतली. गाव चावडीतील चर्चेदरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत वनधन केंद्रांमार्फत चालणाऱ्या विविध वनउपज व्यवसायाच्या आधारे आदिवासी बंधूंनी आणि महिलांनी आपला विकास करून शिक्षण,आपले आरोग्य कसं जोपासता येईल याबाबत विशेष मार्गदर्शन केले.

याप्रसंगी क्रांतिवीर शामादादा कोलाम वनधन केंद्र सिंगलदिपचे संदिपभाऊ आत्राम, विदर्भ वनधन केंद्र इंदिराग्रामचे विलास टेकाम, वीर बाबाराव शेडमाके वनधन केंद्र खंडणी चे वसंता आत्राम, शबरी वनधन केंद्र शिवनाळाचे अनंता टेकाम, यांनी आपआपल्या केंद्राची माहिती देत वनधन केंद्रांमार्फत सुरु असलेल्या चालू घडामोडी बाबत माहिती दिली.जानकाई पोड येथील गिरजा टेकाम,कल्पना आत्राम यांनी पळस बागेची माहिती देत शेतकरी महिलांना घरच्या घरी विष मुक्त भाजी पाला आपल्या परिवाराला कसा मिळेल आणि परिवाराच आरोग्य उत्तम कसं राखता येईल याबाबत विशेष माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies