🔸कोरंबी मारेगाव येथील घटना
🔸चंद्रपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू
वणी तालुक्यातील कोरंबी येथील शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची घटना आज शनिवारला सकाळी ११ वाजता घडली.
विवेक देवराव चटप (४८) असे विष घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.विवेक वडिलोपार्जित शेती करीत कुटुंबाचा गाडा हाकत असे.त्यांचेवर खाजगी कर्ज मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती आहे.कर्जामुळे मागील अनेक दिवसांपासून अस्वस्थ असायचे.आज शनिवारी सकाळी कीटकनाशक द्रव्य प्राशन करीत घरी आराम केला.ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच तात्काळ वणी येथे हलविले.
प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर येथे हलविल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.त्यांच्या मृत्यूने कॊरंबी मारेगाव येथे शोककळा पसरली आहे.
आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याच्या पश्चात आई वडील,पत्नी,दोन मुले असा आप्तपरिवार आहे.