Type Here to Get Search Results !

मोदी को आया होश..मारेगावात काँग्रेसचा जल्लोष!

🔸बळी गेलेल्या बळीराजाचा हिशेब चुकता करा : काँग्रेसचे आवाहन


🔸पोशिंद्या समोर अखेर केंद्र सरकार नमल्याची भावना प्रतिबिंबित 

मारेगाव  : प्रतिनिधी
मागील अकरा महिन्यापासून केंद्र सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात अविरतपणे आंदोलनाची धग कायम असतांना अखेर हे कायदे रद्द करण्याची नामुष्की केंद्र सरकारवर ओढवली.हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असून रद्द ची घोषणा  होताच मारेगावात काँग्रेसच्या वतीने फटाके फोडीत जल्लोष केला.

कृषी प्रधान देशाच्या पोशिंद्याच्या शेतीव्यवस्था भांडवलदारांच्या घशात घालण्यासाठी मोदी सरकारने तीन कृषी कायदे आणले होते.संयम आणि शांततेने या कायद्याच्या विरोधात मागील अकरा महिन्यापासून शेतकरी आंदोलनाची धग कायम असतांना सरकारच्या पायाखालील वाळू सरकत  होती आणि हे कायदे रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. या शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयाने मारेगावात जल्लोष करण्यात आला.

 दरम्यान आंदोलनात बळी गेलेल्या व चिरडून टाकलेल्या प्रत्येक घटनेचा हिशेब चुकता करण्यासाठी आगामी काळात जनतेंनी सावध होत संधी दवडू नका.परिवर्तनाची कास धरून एकजुटीची ताकद दाखविण्याची वेळ आली असून सत्तेचा पलटवार यानिमित्ताने कृतीत उतरवा असे आवाहन यावेळी काँग्रेस कडून करण्यात आले.

या जल्लोष प्रसंगी तालुका अध्यक्ष मारोती गौरकार , खालीद पटेल, वसंतराव आसुटकर, शरीफ अहेमद कुरेशी,शेख युसूफ शेख नबी,अरविंद वखनोर,यादवराव पांडे,शंकरराव मडावी,शशिकांत आंबटकर,यादवराव काळे, रवींद्र धानोरकर,विनोद आत्राम,अमोल थेरे,आनंदराव मसराम,आकाश बदकी,मंजुषा मडावी,सुप्रिया जोगी आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies