🔸जखमी देरकर यांना चंद्रपूर हलविले
🔸 डोके आणि कानाजवळ जबर मार
मारेगाव : दीपक डोहणे
वेगाव बोटोणी गणाचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर यांना क्षुल्लक कारणावरून चक्क दगडाने मारल्याची घटना आज शुक्रवारला सकाळी नऊ वाजताचे दरम्यान घडल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.दरम्यान जखमी देरकर यांना चंद्रपूर येथे पुढील उपचारार्थ हलविण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर हे मूळ गाव असलेल्या वेगाव येथील रस्त्यालगत आज सकाळी उभे होते.यावेळी मारेगाव येथून आलेल्या एका युवकास नमस्कार घेतला. त्या युवकाने चक्क दगड उचलत देरकर यांचेवर भिरकाविला. यात देरकर यांच्या डोके व कानालगत जबर मार लागल्याने त्यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
संशायीत युवकाने घटनास्थळावरून पोबारा केला.
परिणामी त्या युवकाने नेमकी कशामुळे मारहाण केली याची माहिती प्राप्त होवू शकली नाही.वृत्त लिहिपर्यंत पोलिसात तक्रार झाली नव्हती.