🔸 भुरकी पोड ( खंडणी ) येथील घटना
🔸कर्करोगाने होते ग्रासून
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील भुरकी पोड येथील जावयाने कर्करोगाचा त्रास असह्य झाल्याने पडीक जागेवरील झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
हरिदास वसंतराव रामपुरे (४८) असे आत्महत्या केलेल्या जावयाचे नाव असून ते मूळचे गोंडबूरांडा येथील आहे.मागील अनेक दिवसापासून वास्तव्यात असलेल्या जावयास कर्करोग आजाराने ग्रासले होते.या गंभीर आजाराच्या वेदना असह्य झाल्याने गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची माहिती प्राप्त झाली आहे.दरम्यान आत्महत्या केलेल्या जावयाच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा आप्तपरिवार आहे.