🔸तीन अपघातात पाच जखमी
🔸ग्रामीण रुग्णालयात रेफर वाहन मिळेना
मारेगाव : प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यात आजचा बुधवार हा अपघात वार ठरला.सायंकाळी सहा वाजता तब्बल तीन अपघातात पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. मात्र मारेगाव रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर यवतमाळ हलविण्यासाठी रेफर वाहन उपलब्ध नसल्याने जखमी रुग्णांची परवड झाल्याचे विदारक चित्र बघावयास मिळाले.दरम्यान खाजगी वाहनातून रुग्णांना हलविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू होता.
मारेगाव येथून भद्रावती येथे स्कुटीने जाणाऱ्या कुटुंबाला मांगरुळ येथे अपघात होऊन पती , पत्नी व मुलगा जखमी झाले.यात प्रमोद कलाम (३८),दुर्गा कलाम (३५) व हंस (८) रा. भद्रावती जिल्हा चंद्रपूर हे जखमी झाले.दुसऱ्या अपघातात अज्ञात अँटोने पादचाऱ्यास पेट्रोल पंप नजीक धडक देऊन तुळशीराम जेणेकर (४०) रा. मांगरुळ गंभीर जखमी झाले.तिसरा अपघात निमणी झमकोला येथे दुचाकीने जात असतांना बंदी वाढोना नजीक वळण रस्त्याने दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटून हुसेन ढोबरे (४०)रा.भालेवाडी हे जखमी झाले.
दरम्यान प्राथमिक उपचारानंतर तब्बल एक तासाने रेफर वाहनाने तुळशीराम जेणेकर यांना तर दुर्गा कलाम यांना चंद्रपूर येथे पुढील उपचारार्थ हलविण्यात आले होते.