कुंभा - प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील सिंधी (महागाव )येथील येथील 28 वर्षे युवकाने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी 6वाजताच्या दरम्यान घडली.
तालुक्यातील सिंधी महागाव येथील अंकुश अरुण महारतळे वय 28 वर्ष असे मृतक युवकाचे नाव आहे. मृतक युवकाने दहा तारखेला घरी कुणी नसल्याची संधी साधत विषारी औषध प्राशन केले. सदरची घटना घरच्या मंडळीच्या लक्षात येताच त्याला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारार्थ चंद्रपूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्यामागे आई वडील एक भाऊ असा परिवार आहे.तूर्तास आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.