मारेगाव- दीपक डोहणे
शहरात सध्या पाऊस अन दारू धुमाकूळ घालत आहे.ऐन दुर्गा उत्सव,दसरा,ईद मिलाद यासारख्या पवित्र वातावरणात शहरातील अवैध दारू विक्रेत्यांनी दारू विक्रीचा सपाटा लावला आहे.नवीन ठाणेदार दारू विक्रीचे हे आव्हान कसे पेलतात याकडे नागरिकांच्या नजरा लागलेल्या आहे.
सध्या शहरात अवैध दारूविक्रेत्यांनी बरेच वर डोके काढले आहे.ऐन न्यायालयाच्या हाकेच्या अंतरावर या मुजोर दारूविक्रेत्यांनी आपला व्यवसाय बेफामपणे चालविला आहे.आम्ही हप्ते देतो अन दारू विकतो म्हणत अरेरावी करणाऱ्या या दारूच्या ठेकेदारांनी उच्छाद मांडला आहे.आज बंद च्या पार्श्वभूमीवर जुन्या पोस्ट आफिस जवळ चक्क हनुमान मंदिर च्या बाजूला खुलेआम दारूविक्री सुरू होती.यावेळी परिसरातील नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिली.जमादार आनंद अलचेवार यांनी दारूचे 22 शिशा जप्त केले.मात्र विक्रेता हातावर तुरी देऊन फरार झाला.
पंचांना विक्रेत्यांची जीवे मारण्याची धमकी.या कारवाई ची कुणकुण लागताच फरार दारूविक्रेत्यांने हातात काठी घेऊन पंचांना पाहून घेण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकाराने अवैध दारूविक्रेत्यांची हिम्मत किती वाढली हे आज दिसून आले.यापूर्वीही एका नागरिकवर याच विक्रेत्याने हल्ला चढवून हात तोडला होता हे उल्लेखनीय.
नवीन ठाणेदारा पुढे अवैध दारूबंदी चे तगडे आव्हान.मारेगाव येथे नव्याने आलेल्या ठाणेदार राजेश पुरी यांना पहिल्याच दिवशी कलम 302 ची सलामी मिळाली.आता शहरातील बेभान दारूविक्री चे तगडे आव्हान ठाणेदार पुरी यांच्यापुढे उभे आहे.ते किती प्रमाणात याला मुसक्या आवळतात हे येणारा काळ सांगेल.सध्यातरी दारूविक्रेत्यांचा हा धुमाकूळ नागरिकांसाठी कमालीची डोकेदुखी ठरत आहे.