मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील आठवडी बाजारात जुगारावर आज चार वाजताच्या दरम्यान धाड टाकून चार जणांविरुद्ध जुगार ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुंभा येथील आठवडी बाजारातील एका चिकन दुकानासमोर जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहितीचा आधारे आज दि.18 ऑक्टोबर रोजी दोन वाजताच्या दरम्यान धाड टाकली . यावेळी काही इसम एका बादशाह नावाच्या पैशाची बाजी लावून हार जीत पत्ता जुगार खेळ खेळत होते . यावेळी दोघांना घटनास्थळावर अटक केली तर इतर तिघे जण पसार झाले. यावेळी घटनास्थळावरून बावन गंजी पे व सहाशे चाळीस रुपये असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या पाचही जनावर जुगार प्रतिबंधक नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे