Type Here to Get Search Results !

सांध्य ब्रेकींग... अखेर 'आई' वर खुनाचा गुन्हा दाखल

 🔷मारेगाव येथील मारहाणीतील मृत्यू प्रकरण
 🔷नविन ठाणेदारास गुन्हेगारीची सलामी

  
   

मारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव येथील प्रभाग क्रं.आठ मध्ये घराशेजारील दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीत एकाचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.या प्रकरणात प्रतिस्पर्धी विधीसंघर्ष असलेल्या भावासोबत दोघांना काल रात्री अटक करण्यात आली.मात्र या घटनेने तणाव पुर्ण वातावरण तयार झाल्याने प्रभागातील महिलांनी पोलिसांत धडक देवून संशायित आरोपींच्या आईला अटक करण्याची मागणी रेटून धरली.उपविभागीय  पोलिस अधिकारी यांनी थेट भेट देत चौकशीचे आदेश देत चौकशी अंती संशायित आरोपीच्या आई वर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान पहिल्या वहिल्या दिवसातच नव्याने रुजू झालेल्या ठाणेदार राजेश पुरी यांना मारेगाव शहरातील गुन्हेगारी ची सलामी देण्यात आल्याची चर्चा जोर पकडत आहे.



शहरातील प्रभाग क्रं. आठ मधील घरासमोर असलेल्या वाढई व लालसरे युवकात दि.११ ला रात्री हाणामारी झाली.या वादात संजय लक्ष्मण वाढई (३४) या युवकाचा दोन दिवसात यवतमाळ  रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला.या घटनेने प्रभागातील वातावरण तणावपुर्ण झाले.परिणामी मृतक संजयच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दाखल  करताच संशायित आरोपी हर्षल धनराज लालसरे (२३) व यांचा 17 वर्षीय लहान भाऊ यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली.मात्र मृत्यू प्रकरणाने येथील महिलांनी आज गुरुवारला पोलिस स्टेशन गाठत संशायिताच्या आईलाही अटक करण्याची मागणी केली.अशातच उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी मारेगाव येथे भेट देवून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.चौकशी अंती संशायित आरोपीं ची आई  रेखा धनराज लालसरे हिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.



 परिणामी मारेगाव येथे घडलेल्या घटनेने माय लेकावरील अटकेच्या सत्राने  वेगवेगळ्या चर्चेला पेव फुटले आहे.शहरातील गुन्हेगार प्रवृत्तीच्या या घटनेने चाप कसा बसेल हा येणारा काळ  ठरविणार असला तरी अवघ्या दोन दिवसापूर्वी नव्याने रुजू झालेल्या ठाणेदार राजेश पुरी यांना या मारेगावातील घटनेने सलामी दिली एवढे मात्र खरे. सदर घटनेने तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचे तगडे आव्हान पोलिस प्रशासना समोर या निमित्ताने उभे ठाकले आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies