Type Here to Get Search Results !

जागर स्त्री जन्माचा सन्मान कन्या रत्नांचा

जागर स्त्री जन्माचा सन्मान कन्या रत्नांचा

 नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था उमरखेड चा उपक्रम

             
 सध्या आपल्या देशात नवरात्र उत्सव अगदी आनंदात व उत्साहात सुरू आहे. नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीची उपासना, नवरात्र म्हणजे स्त्री मध्ये असलेल्या अद्भुत अशा शक्तीचा जागर, पण मुलगी "नकोशी" या मानसिकतेतून स्त्रीभ्रूणहत्या करण्याचे पाप आपल्या आजूबाजूला घडत असल्याचा इतिहास ही आपल्या डोळ्यासमोर येतो. मुलगी म्हणजे खर्च असे आई-वडील मानतात. जन्माला आल्यापासून तिच्या हुंड्यासाठी तजवीज करावी लागणार असे पालकांना वाटते. त्यामुळे मुलीसोबत दुय्यम वागणूक अगदी  लहानपणापासून होते. आरोग्य, पुरेसा आहार ,उच्च शिक्षण याबाबत तिच्यासोबत नेहमी भेदभाव केला जातो.
             समाजात असलेली "नकोशी" बाबतची भूमिका बदलण्याच्या दृष्टिकोनातून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था उमरखेड च्या वतीने येथील राजाराम प्रभाजी उपजिल्हा रुग्णालयात जन्माला आलेल्या कन्यारत्नाचा व त्यांच्या माता सौ.पुजा अमोल लवटे विडूळ,सौ.रेखा राजू जाधव वारंगा,सौ.ञिवेणा सुरेश इंगोले झोडगा ,सौ.शिवाणी धम्मपाल सावते देवसरी,सौ.हर्षदा कपिल डोमे उंपासा यांचा साडी चोळी, बाळासाठी कपडे देऊन योग्य तो सन्मान करून मुलामुलींमध्ये भेदभाव करू नका असा संदेश देण्यात आला.
        आज मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे ही चिंतेची बाब आहे दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या गैरवापरामुळे स्त्रीभ्रूणहत्येच्या पापा मध्ये अनेक धनधांगडे व्यक्ती सहभागी होत असतात. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी, स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी केवळ कडक कायदे करून न थांबता या प्रश्नावर व्यापक जनजागृती सोबतच योग्य त्या उपाययोजना राबविण्याची गरज आहे. जन्माला आलेल्या कन्या रत्नांचे उपस्थित सर्व कर्मचारी, नागरिक ,माता भगिनी यांना पेढे वाटून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने एक अनोखा संदेश देण्यात आला. 
          संस्थेचे अमरावती विभागीय अध्यक्ष प्रभाकर दिघेवार यांच्‍या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाच्या वेळी डॉ.आशिष उगले डॉ. देवसरकर, नवजात कन्यांचे आप्तेष्ट, रुग्णालयाचे कर्मचारी, संस्थेचे पूर्व महाराष्ट्र अध्यक्ष  दिपक ठाकरे, यवतमाळ जिल्हा सचिव गजानन रासकर ,उमरखेड तालुका अध्यक्ष राजेश माने, गजानन वानखेडे, डॉ. प्रा. अनिल काळबांडे ,रामकिसन शिंदे, सचिन कटके ,कमलेश राठोड, गजानन साखरे, विजय नगरकर, श्रीराम बिजोरे, काशिनाथ कुबडे, रवी चांदले ,देविदास कानडे ,मनोज कदम,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

      *फोटो*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies