🔸गुरुदेव सेवा व नेहरू युवा मंडळाचा पुढाकार
मारेगाव : कैलास ठेंगणे
गावातील लोकांना स्वच्छतेचे महत्व कळावे,गाव प्लास्टिक मुक्त व्हावे या उद्देशाने क्लीन इंडिया आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून नेहरू युवा केंद्र यवतमाळ अंतर्गत मारेगाव तालुक्यातील केगाव येथे गुरुदेव सेवा मंडळ आणि नेहरू युवा मंडळातील सदस्य तसेच गावातील पुरुष व महिलांद्वारा स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले.
यावेळी गावातील ग्रामसफाई करण्यात आली. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे नामदेव पिदुरकर, विसवेश्वर दंडांजे,श्रीराम पायघन,शंकर नागपुरे,धीरज आवारी,समीर पिदुरकर तसेच नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक मोहन पायघन उपस्थित होते. जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम आणि पदाधिकारी अनिल ढेंगे याच्या मागर्दर्शनात हि ग्रामस्वच्छता करण्यात आली.