Type Here to Get Search Results !

दिलासादायक...अखेर वेगाव सरंक्षणभिंताचा मार्ग सुकर

🔸 रमण डोये यांच्या प्रयत्नाला यथोचित यश 
मारेगाव। : दीपक डोहणे
पिढीजात घराची वस्ती वसलेल्या वेगाव निर्गुडा नदी तिरावरील घाट कोसळत असतांना येथील घरांचा प्रश्न गंभीर झाला.यासाठी संरक्षण भिंत उभारणीसाठी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रमण डोये यांनी मागील सात वर्षांपासून सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरवठा केल्याने अखेर संरक्षण भिंतीचे काम करण्याचा मार्ग प्रशासनाकडून मोकळा झाला आहे.  नागरिकांचा संवेदनशील बनलेल्या प्रश्नाला प्रशासन दरबारी मंजुरात मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
    तालुक्यातील वेगाव येथील निर्गुडा नदीचे पात्र आहे.दुतर्फास घरांची वस्ती असल्याने सातत्याच्या पाण्याने नदीचा घाट हळूहळू कोसळत होता.त्यामुळे घरांचा प्रश्न ऐरणीवर आला अशातच अनेकांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन घरे इतरत्र हलविले.मात्र आर्थिकदृष्ट्या कमकुवतांना घराचे स्थानांतरण अशक्य झाले.
     हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा व संवेदनशील प्रश्न प्रामुख्याने संरक्षण भिंत निर्माण करण्यासाठी निवेदन , तक्रारी, प्रत्यक्षभेट देत प्रशासन दरबारी रमण डोये यांनी लावून धरला.लेटलतीफ कर्मचारी , लोकप्रतिनिधींची अनास्था यामुळे कागदी घोडे तब्बल सात वर्षे धूळखात राहिले. यातच कोरोनाचीही भर पडली.दिवसागणिक विलंब होत असतांना मात्र सर्वसामान्य जनतेच्या न्यायिक मागणीसाठी रमण डोये यांनी हा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यात यश संपादन केले.
    विदर्भ पाटबंधारे विभाग कडून ही सरंक्षणभिंत उभारणीची गती मिळून खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्राने  जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील यांनी हालचालीला वेग दिला.त्यामुळे गुरुवारला वेगाव येथे पाटबंधारे विभागाचे पथक दाखल होऊन पाहणी केली.अवघ्या दिवसातच सरंक्षणभिंत कामाला मूर्तरुप येणार असून सातत्याने प्रशासन , मंत्री , खासदार यांच्याभेटीतून रमण डोये यांच्या प्रयत्नांची फलश्रुती दिसणार आहे.आणि वेगावकरांच्या संभाव्य धोक्याचा प्रश्न कायमस्वरूपी थांबणार असल्याच्या आशा पल्लवित झाल्या आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies