कुंभा येथील घटना
विदर्भ सर्च न्यूज | कैलास ठेंगणे
कुंभा (१२.ऑक्टो) तालुक्यातील कुंभा येथील एका वृद्ध महिलेच्या सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना १० ऑक्टोंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता च्या दरम्यान घडली. मागील काही दिवसापासून तालुक्यात सोनसाखळी चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने कायद्याचा वचक हरवल्याचे दिसत आहे.
विठाबाई झाडे नामक ७५ वर्षीय महिला घरात झोपून होती .गावात आर्केस्ट्रा चा कार्यक्रम असल्यामुळे घरातील मंडळी कार्यक्रम पाहायला गेली होती. वृद्ध महिला गाढ झोपेत असताना चोरट्याने गळ्यातील मंगळसूत्र कानातील डूल व मोबाईल असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याबाबत पोलिसात वृद्ध महिलेचा नातू गजानन आस्वले यांनी मारेगाव पोलिसात तक्रार दिली. या तक्रारी मध्ये येथील दोघांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान तालुक्यात चोरीच्या प्रामुख्याने सोने लंपास करण्याच्या घटनेत वाढ होत असतांना तालुक्यातील बाजारवाडी आता चोरट्यांच्या निशाण्यावर आहे.मागील मंगळवारी मारेगाव येथील आठवडी बाजारातून भाजी खरेदी करतांना महिलेची सोनसाखळी लांबविली होती.चोरट्यांचा अजूनही थांगपत्ता लागला नाही त्यामुळे पोलिसां समोर तगडे आव्हान उभे ठाकले आहे.


