आरोग्य विभागाची परीक्षा आता २४ व ३१ ऑक्टोबरला – आरोग्यमंत्री टोपे
आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांसाठी २५ आणि २६ सप्टेंबरला घेतली जाणारी लेखी परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. यामुळे ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संतपाचे वातावरण दिसून आले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या परीक्षांसंदर्भात आज महत्वपूर्ण माहिती दिली. परीक्षांच्या नव्या तारखा निश्चित झाल्या असल्याची त्यांनी सांगितले असून, त्यानुसार आता गट – क संवर्गाची परीक्षा २४ ऑक्टोबर व गट – ड संवर्गाची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय आज दि २७/९ /२०२१ सोमवार आरोग्य विभाग व न्यासा कंपनीच्या अधिकऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत झाला आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, ”कोणताही धोका न पत्करता या दोन्ही दिवशी रविवार असल्याने, शाळा शंभर टक्के उपलब्ध होतातच. या अनुषंगाने या तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. ९ दिवस अगोदर सर्व परीक्षार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले पाहिजेत.याबाबत देखील खात्री केली जाईल.
तसेच, ”मला एवढचं सांगायंचं आहे की कुणीही कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना मी वेळोवेळी दिलेल्या आहेत. कोणालाही कुठेही काही चुकीचा प्रकार होत असल्याचं आढळलं, तर त्यांनी तत्काळ थेट पोलिसांना संबंधितांचं नाव कळवावं व त्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम करावं. परीक्षा अत्यंत पारदर्शकचं व्हायला हव्यात. कुठेही गडबड होणार नाही याची काळजी घेण्याचं काम आम्ही करत आहोत.” असंही यावेळी राजेश टोपे यांनी सांगितलं.
आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झालेली नाही, तर पुढे ढकलली आहे – टोपे