सावरगांव येथे प्रापर्टीच्या वादातून मारहाण
कळंब:- (तालुका प्रतिनिधी)
तालुक्यातील सावरगांव येथील फिर्यादी अनिल मनोहर आष्टीकर वय ५१ वर्ष यांनी सिंचनासाठी पाणी शेतातुन नेत असल्यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याची कळंब पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर यातील विरोधी पार्टी श्रीमती साधना संजय आष्टीकर वय ५५ वर्ष हीने प्रापर्टीच्या वादातून सदर महिलेची मुले हेमंत संजय आष्टीकर वय ३० वर्ष व तेजस संजय आष्टीकर वय २७ वर्ष यांना मारहाण केल्याची तक्रार श्रीमती साधना आष्टीकर यांनी दिली दिर व भावजयी यांच्या एकमेकांच्या तक्रारी वरुन कलम ३२४,५०४,५०६,३४ भादविचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमा. गजानन धात्रक करीत आहेत.