आजादी का अमृतमहोत्सव सायकल रॅलीचे यवतमाळ जिल्ह्यात आगमन
कन्याकुमारी येथून सुरू झालेली केंद्रीय राखीव पोलिस दलाची आजादी का अमृत महोत्सव या सायकल रॅलीचे यवतमाळ जिल्ह्यात आगमन झाले. पांढरकवडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांनी या रॅलीचे स्वागत केले. सायकल रॅली २ ऑक्टोबरला दिल्ली येथील राजघाटवर पोहोचत असून तेथेच या रॅलीचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रमुख उपस्थितीत समारोप होणार आहे.
रॅलीमध्ये 16 जवान सायकल चालवत असून गावागावातील युवकांनी , निरोगी रहावे व देशाच्या जडणघडणीत आपले योगदान द्यावे असे आवाहन करीत आहे. रॅलीमध्ये इस्पेक्टर अजय कुमार यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.अजयकुमार बिहारमध्ये कर्तव्यावर असताना नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचा एक पाय तुटला गेला.
तरीही अजय कुमार कृत्रिम पाय लावून रॅलीमध्ये मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत.
तरीही अजय कुमार कृत्रिम पाय लावून रॅलीमध्ये मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत.