विरुद्ध दिशेने येणा-या वाहनावर आरटीओ पथक व वाहतुक विभागाची कार्यवाही
नागपुर तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या तब्बल 70 वाहनांवर आरटीओ पथक आणि वाहतूक विभागाने संयुक्तिक रित्या दिनांक 23 ऑगस्ट रोजी सोमवारला महावितरण कार्यालय जवळ कारवाई करत 33 हजार रुपयाचा दंड वसुल केला आहे.
चौपदरीकरणाचे हल्ली काम झाले असुन यामध्ये
काही ठिकाणी अर्धवट काम करण्यात आले आहे
या अर्धवट कामाचा फायदा घेत वाहतुक नियमांना पायी तुडवत अनेक जन विरुद्ध दिशेने आपली वाहने घेउन जातांना दिसत आहे
आर्णी शहरातील कोळवन फाटा ते आर्णी व महावितरण कार्यालय ते येरमे पेट्रोल पंप या ठिकाणी अनेक जन भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने आपली वाहने आणतात.

आर्णी शहरातच नव्हे तर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी नागरिक आपले 5 मिनिट वाचविण्याच्या नादात वाहतुक नियमांना पायदळी तुडवत आपला जिव धोक्यात घालत विरुद्ध दिशेने येतात या विरुद्ध दिशेने येणा-या वाहनामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तर आपघातात अनेकांनी आपला जिव सुद्धा गमावला आहे.
त्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर आरटीओ पोलीस निरीक्षक राहुल चौधरी व संचीन निकम आणि वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल सांगळे व त्यांच्या पथकाने कार्यवाही केली आहे .
या मध्ये दुचाकी सह चार चाकी वाहन व महामंडळाच्या बसला सुद्धा मेमो देण्यात आला आहे.
नागरिकांनी सर्व्हिस रोडचा वापर करावा
आर्णी वरून यवतमाळ रोड वर जाण्यासाठी नागरिक विरुद्ध दिशेने आपली वाहने आणत आहे हे अत्यंत धोक्याचे असुन महावितरण कार्यालया जवळील उड्डाणपुलाखालुन गुरुनानक धाब्या समोरील सर्विस रोड सुरू झाला असून नागरिकांनी आपले जीव धोक्यात न घालता यवतमाळ रोड वर जाण्यासाठी त्या सर्विस रोड चा वापर करावा असे आवाहन वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल सांगळे यांनी नागरिकांना केले आहे
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे
राष्ट्रीय महामार्गावर आर्णी तालुक्यासह ईतर ठिकाणी नागरिक आपला वेळ वाचविण्याच्या नादात भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने येत आहे व आपला जीव धोक्यात टाकत आहे.
पाच ते दहा मिनिट वाचविण्यासाठी नागरिकांनी आपले अमूल्य जीव धोक्यात न टाकता वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन आरटीओ पोलीस निरीक्षक राहुल चौधरी यांनी नागरिकांना केले आहे