आदिवासिंच्या विविध संघटनांनी आक्षेपार्ह कमेंट करणार्यावर अटँसिटि दाखल करण्याची केली मागणी
-----------------------------
आर्णी तालुका प्रतिनिधी :- फेसबुक या सोशल मीडियावर आदिवासी समाजावर अश्लील व जातीवाचक अशी आक्षेपार्ह कमेंट्स केली गेली ज्यामुळे तमाम आदिवासी समाजाची मानहानी झाली आहे, समाजाच्या भावना दुखावल्यामुळे त्याचे तिव्र पडसाद उमटले. येथिल आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी आर्णी पोलीस स्टेशनला लेखी निवेदन देऊन निषेध व्यक्त केला यावेळी येथील पी. एस.आय.दिलिप मेसराम यांना निवेदन देऊन अटँसिटि अँक्ट लावण्याची मागणी केल
सविस्तर वृत्त असे की 9 आँगस्ट हा दिवस 1994 ला जागतिक आदिवासी दिन म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने (युनोने )घोषित केला त्यामुळे 9आँगस्ट हा दिवस सर्व जगात आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवसा निमित्ताने महागाव येथील आदिवासी युवकाने जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पर फेसबुक वर पोस्ट टाकली असता त्या पोस्ट वर तुपटाकळी येथील नामे गोपाल ढोरे या गैरआदिवासी युवकाने त्यावर जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करून समाज विघातक अशी कमेंट्स केली ज्यामुळे तमाम आदिवासी समाजात याचे तिव्र पडसाद उमटले समाजाच्या भावणा दुखावल्या गेल्या त्यामुळे संतप्त बांधवांनी आपल्या भावना आर्णी पोलिस स्टेशनला लेखी निवेदन देऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली .
हे निवेदन देते वेळी आदिवासी विकास परिषद चे जिल्हाध्यक्ष नेरेश गेडाम, आर. एम. मडावी , शिवसेनेचे आर्णी केळापुर चे संपर्क सहप्रमुख अमोल मंगाम सर, भाजपाचे जिल्हा सचिव राहुल सोयाम, बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सचिन आत्राम, आदिवासी विकास परिषद चे तालुकाध्यक्ष भारत चांदेकर, बिरसा क्रांतीदल तालुकाध्यक्ष प्रमोद टेकाम, किसन लाडके, अनिल पिंगळे, विनोद सोयाम, रणधीर किनाके सर, देवानंद चांदेकर शिवाजी मेसराम, निखी