देशात आदिवासी समाजाचे अस्तित्व धोक्यात, शैक्षणिक क्रांती घडेल तेव्हाच आम्ही टिकू-प्रभाकर गेडाम
लाठी येथे संपन्न झाला अद्भुत जागतिक मूळ निवासी दिवस*
*जय रावण आदिवासी समाज मंडळ लाठी ह्यांच्या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा
राजूरा / प्रतिनिधी
संतोष कूलमेथे
गोंडपिपरी तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात जागतिक मूळनिवासी दिनाच्या निमित्ताने लहान लहान गुड्यातील आदिवासी समाज एकत्र येऊन सांस्कृतिक, प्रबोधनात्मक, पारंपरिक, कार्यक्रम घेऊन समाजाला एकत्रित करायचे कार्य दुर्गम भागात लाठी येथील आदिवासी कार्यकर्ते घडवून आणले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावच्या माजी सरपंच सुमनताई गेडाम.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ मधुकर जी कोटनाके.
आदिवासी समाज हा आधीपासून निसर्ग पूजक असल्याने आता आमच्या वर हिंदू संस्कृती लादण्याचा प्रयत्न केला जात आहे असे मत डॉ मधुकर कोटनाके ह्यांनी समजाला संबोधले.
आदिवासी समाजाला आता शिक्षणा सोबतच व्यावसायिक दृष्टीने ने बघावे लागेल असे मत घनश्याम मेश्राम यांनी सांगितले.
गावात रॅली काढण्यात आली. त्या नंतर झेंडा वंदन करून कर कार्यक्रमाला सुरवात झाली.
. गावातील मुलांनी रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून आदिवासी संस्कृती दर्शन घडवून लोकांची मने जिंकली.