खेड नगर परिषदेत बिरसा क्रांती दल खेड तालुका शाखा कार्यालयास ऑफिस साठी जागा उपलब्ध करून द्या
प्रतिनिधी आशिष आढळ
पुणे -खेड नगरपरिषद मध्ये बिरसा क्रांती दल शाखा कार्यालयास जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सो नगरपरिषद ता.खेड जि पुणे बिरसा क्रांती दल संघटनेनी निवेदन देऊन केली आहे,खेड तालुक्यातील किमान ६० हजार लोकसंख्या आदिवासी असून व प्रोपर खेड नगर परिषद हद्दीमध्ये १० हजार आदिवासी लोकसंख्या नागरिक राहत असून एक दीड वर्षापूर्वी बिरसा क्रांती दल खेड शाखेची स्थापना होऊन कार्यरीत आहे.तरी आपल्या कार्यालयात (नगरपरिषद) मध्ये बिरसा क्रांती दलाच्या कार्यालयासाठी व आदिवासी समाजाच्या इतरही
संघटनाला कार्य लयाचा उपयोग होईल. म्हणून आपल्या नगरपरिषेद इमारतीमध्ये बिरसा क्रांती दल खेड तालुका शाखेला कार्यलयास जागा व गाळा मिळवा अशी मागणी बिरसा क्रांती दल संघटनेनी निवेदन देऊन केली आहे या वेळी उपस्थित पुणे जिल्हा अध्यक्ष मा दत्तात्रय कोकाटे सर, जिल्हा कार्याध्यक्ष मा हरिभाऊ तळपे पुणे जिल्हा उपाध्यक्ष नगरसेवक मा राहुल आढारी जिल्हा महासचिव किरण तळपे सचिव शशिकांत आढारी जिल्हा संघटक मा चिंधू आढळ,तालुका अध्यक्ष मा सुधीर भोमाळे उपाध्यक्ष सुरेश भोकटे, कैलास मेठल, संजय लोखंडे,कार्याध्यक्ष संतोष भांगे सचिव बाळासाहेब मदगे सचिव पुंडलिक बुरुड , प्रकाश तळपे,संघटक आनंता मेठल रामदास मेठल, दत्ता चौधरी,दौवदिप गवारी, संतोष वासळे,चिंधू वासाळे चाकण शहर अध्यक्ष बारकू ठोकळ इत्यादी बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते