प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तीवर बंदी घाला - वणी शहरातील मुर्तीकार बांधवांचे निवेदनाद्वारे मागणी
वणी : आगामी काळात श्री गणेश उत्सव सण मोठया प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. त्या सनानिमीत्य वणी शहरातील सर्व मुर्तीकारांनी पर्यावरण पुरक मातीच्या मुर्त्या बणविण्याचा एक मताने निर्णय घेतला आहे. परंतु काही व्यवसायीक लोक हे बाहेरून प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या श्री गणेशमुर्ती वणी शहरात आणुन त्यांची मोठ्याप्रमाणात विक्री करतात. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. वणी शहरात प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तीला शासनाकडून बंदी असल्याने बाहेर गावावरुन वणी शहरात विक्री करीता मुर्त्या आणल्यास त्यांचेवर योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शहरातील सर्व मुर्तीकार बांधवाद्वारे येथिल उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी नामवंत मुर्तीकार सुधाकर बुरडकर, लहु दातारकर, नथ्थु डुकरे,सुभाष झिलपे,सुहास झिलपे इत्यांदींसह मुर्तीकार बांधव उपस्थित होते.