Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्यदिनी प्रथमच्या यूथनेट एंड अड़ोलेशन्स चे डिजिटल प्रमाणपत्र मोबाइलवर वाटप .

स्वातंत्र्यदिनी प्रथमच्या यूथनेट एंड अड़ोलेशन्स चे डिजिटल प्रमाणपत्र मोबाइलवर वाटप ..

प्रतिनिधि / कैलास मेश्राम

दि.- १५ ऑगस्ट २०२१
               कोविड च्या काळात प्रथमच्या वतीने ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. स्वतंत्रता दिवसाचे अवचित्य साधुन प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन च्या यूथनेट एंड अड़ोलेशन्स कार्यक्रमा अंतर्गत ऑनलाइन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मोबाइल वर डिजिटल प्रमाणपत्र ( स्किल पासपोर्ट सर्टिफिकेट ) देण्यात आले. ग्रामपंचायत मधील ग्रामसभा सगळीकड़े होत नसल्याने थेट मुलाना प्रसंगी कार्यक्रमाची माहिती आणि संकेतस्थळ भेट मोबाइल वर समजावुन सांगण्यात आली. तसेच कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थीना बोलावून मोबाइल वर कार्यक्रमाचे संकेत स्थळ www.prathamyouthnet.org.in यावर जावून मुलांचे प्रोफाइल मधील स्किल पासपोर्ट वरील सर्टिफिकेट त्यांना प्रदान करण्यात आले. प्रसंगी प्रथमचे मेंटोर संजय कोरडे यानी आपल्या  तालुक्यातीलच नाही तर यवतमाळ , वर्धा , चंद्रपुर आणि गडचिरोली मधील निवडक तालुक्यातील रीच झालेल्या संपूर्ण गावातील विद्यार्थ्याना या पद्धतिचे वितरण करण्यात येणार व प्रथमच्या या कार्यातुन मुलाना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळू शकते असे सुद्धा मार्गदशनातून बोलत होते. राळेगांव आणि मारेगाव तालुक्यातील किमान ५० गावामध्ये हा उपक्रम राबवल्या जात असून गरजू युवक युवतीना प्रशिक्षण वा रोजगाराची संधी मिळवून देण्यास प्रथम कटीबद्ध असल्याचे कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून शक्य असल्याचे देखील बोलत होते. नव्याने सुरु होत असलेल्या बॅच मध्ये अशा गरजूवंत युवक युवतीना प्रवेश देने सुरु असल्याचे बोलत होते.


...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies