वडकी येथील इसमाची नदीत उडी घेऊन आत्महत्या
राळेगाव तालुक्यातील वडकी येथील रहिवासी मारोती जुमनाके यांनी कारेगाव येथील वर्धा नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना आज दि ५ ऑगष्ट रोज गुरूवारला सकाळी ९ वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. बचत गटाचे पासबुक न दिल्यामुळे मृतक २ महिला मध्ये किरकोळ वाद झाला होता.सदर ही आत्महत्या गटाच्या पासबुक पुस्तकासाठी वाद झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदर इसम वडकी येथील सेवानिवृत्त कर्मचारी होते. यात घटनास्थळी पोलिसांनी जावून या घटनेचा पंचनामा केला. व वडकी येथील दोन महिलांना अटक केली आहे.महिलेवर भांदवी कलम ३०६ नुसार व अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे या घटनेचा पुढील तपास पांढरकवड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनात वडकी पो. स्टे. चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक जाधव याघटनेचा तपास करत आहे.या घटनेने वडकी परिसरात सर्वत्र हळहळ वेक्त होतं आहे.