Type Here to Get Search Results !

जागतिक आदिवासी दिन आदिवासी हक्काचा जाहीरनामा- डी.बी अंबुरे

जागतिक आदिवासी दिन आदिवासी हक्काचा जाहीरनामा- डी.बी अंबुरे
         प्रतिनिधी/आशिष आढळे

      संयुक्त राष्ट्रसंघाने १९९३ हे आदिवासी वर्ष जाहीर केले .व ९ ऑगस्ट १९४५ या दिवशी जागतिक आदिवासी दिन घोषित केला.(इंटरनॅशनल डे ऑफ इंडिजिनस पीपल) दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जगाचे प्रचंड नुकसान झाले. जगातील विद्वान लोकांना कळाले की जगातील प्रत्येक राष्ट्राला स्वतंत्र देणे हा त्याचा हक्क आहे. त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची गरज आहे. ही जाणीव जगाला झाली . तसेच दुसऱ्या महायुद्धात वित्तहानी, मनुष्य हानी मोठ्या प्रमाणात झाली .तर त्याच वेळेस मात्र आदिवासी समुदाय जंगलांमध्ये वास्तव्य करून राहत होता. जंगल, संपत्ती व निसर्गाचे संरक्षण करत होता .परंतु विकासापासून कोसो दूर होता. मुख्य प्रवाहात तो आला नव्हता. कारण तो इतरांच्या हक्क व अधिकार हिरावून घेत नव्हता. आदिवासी संस्कृती मध्ये एकमेकांचे स्वातंत्र्य ,अधिकार, मैत्री व समन्वय यांचा प्रथमपासूनच प्राधान्य दिले गेले. 24 ऑक्टोबर 1945 या दिवशी संयुक्त राष्ट्र संघ अस्तित्वात आले. जगातील विविध देशात साधारणपणे जंगलात वास्तव्य करून राहणाऱ्या (मूळ निवासी ) लोकांनी जंगलाचे व पर्यावरणाचे रक्षण व संरक्षण केले. निसर्गाचे संरक्षण करण्याचे काम आदिवासींनी मोठ्या प्रमाणात केले. परंतु आदिवासी समाज मुख्य प्रवाहात नसल्याने या आदिम जमाती शिक्षण ,आरोग्य ,रोजगार या सर्व पासून कोसो दूर राहीले. आदिवासी जमातीचे अस्तित्व मान्य करून संयुक्त राष्ट्रसंघाने ९ ऑगस्त १९९४ या दिवशी जागतिक आदिवासी दिनाची घोषणा केली. हा दिवस आदिवासींच्या आत्मसन्मानाचा दिवस आहे. आपल्या पूर्वजांनी आत्मसन्मानाची आणि स्वाभिमानाची चळवळ चालवली परंतु येथील व्यवस्थेने ती सातत्याने हाणून पाडली. आदिवासी समाज हा समतावादी अस्तित्वावर विश्वास ठेवणारा समाज आहे परंतु ज्या वेळेस परंपरागत स्वतंत्रयावर आघात झाला व परंपरागत जीवनपद्धती नाश होण्याची वेळ आली, त्यावेळी आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रयत्नांना यश येऊ दिले नाही. संपूर्ण भारतात आदिवासी क्रांतिकारकांनी साधारणता ,१७५७ ते १९००व १९०१ ते १९४५ पर्यंत आपल्या हक्क व अधिकारासाठी लढा दिला .ज्या परिसरात आदिवासी समुदाय मोठ्या संख्येने राहात होता त्या भागात अनेक आंदोलने  झाली. उठाव झाले .जसे मध्ये भारतात भिल्ल क्रांतिकारकांनी १८१८ ते १८५८ इंदूर ते नांदूर ,ब्रहानपूर ते रामपूर . श्रीरामपूर ते सुलतानपूर या भागात सतत चाळीस वर्ष जुलमी सत्तेविरूद्ध सशस्त्र लढा दिला .आपल्या स्वातंत्र्यासाठी 11 एप्रिल १८६० रोजी अंबापानी च्या लढाईत अटक झालेल्या ५७ भिल बहादुर रांनी ढोलाच्या ठेक्यावर बंदुकीच्या गोळ्याझेलून पहीला   मान मिळवला. त्या वेळी स्त्रियाही मागे नव्हत्या चारशे स्त्रियांनी स्वतःला अटक करून घेतली. त्यावेळी खाजानाईक तंट्या  मामा ,भागोजी भांगरे आधी आदिवासी वीरांनी मोहिमेचे नेतृत्व केले. हा लढा होता आदिवासींच्या आत्मसन्मानाचा. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक बिरसा क्रांती दलाचे राज्याचे उपाध्यक्ष डी.बी अंबुरे यांनी केले.
      या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेषरावजी इंगळे होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून विठ्ठलराव मळघणे ,(सेवानिवृत्त आर एफ ओ) शंकरराव नाटकर (सेवानिवृत्त डेपो मॅनेजर डेपो मॅनेजर) श्री नारायणराव पिलवंड, भाऊराव जुळे , श्रीमती 
      चंद्रकला भुरके , छबुताई नाटकर  उपस्थित होते. आयोजन समितीचे अध्यक्ष समितीचे अध्यक्ष विठ्ठल पोटे, देवकर ग्रामसेवक, संतोष मेटकर, संतोष पिंपळे, कोंडबाराव झाडे ,ज्ञानेश्वर खराटे ,अर्जुन वायकुळे ,शांतीदास खोकले, चंद्रकांत खंदारे, संजय अंभोरे, इत्यादींनी स्वागत केले.  संचालन कैलास गारोळे यांनी केले तर आभार निर्मले सर यांनी केले. 
      यशस्वीतेसाठी श्री अशोक ढोले, गजानन जुडे, अनंता पांडे ,दत्तराव उगले, शुक्राजी रिठे ,सुदाम शिरडे, योगीराज फोपसे, संतोष मोरे, दत्ता मिरासे, निरंजन वाळके, के.के गवाळे, कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात महिला भगिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनासाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता  खालिल सर्व कर्म चारी बांधवांनी या करिता आर्थिक मदत केली.
डी.बी अंबुरे, शेषराव इंगळे ,लक्ष्मण भस्मे, के.के.गव्हाळे  देवकर बबन, व्ही. आर पोटे, प्रकाश वायकुळे ,सुखदेव शेळके, दिनेश वानोळे ,संजय अंभोरे ,विजय कराळे,निरंजन वाळके ,पुंजाराम मेंडके,सुदाम शिरडे ,माधव माहुरे ,संतोष माहुरे ,गारोळे तलाठी, कैलाश गारोळे ,विमल फोले मॅडम,संगिता फोपसे ,चंद्रकांत खंदारे 
कराळे साहेब  (mseb ) रामेश्वर मोरे,
 विजय चवरे, भाऊराव जुडे ,सुदाम खोकले बापूराव किरवले , दतराव उगले संतोष खरवडे ,ब्रिजेश डोकडे,मारोती कोकाटे,दत्ता मिरासे , शेखोराव पिंपळे,सुनील शिंदे
निर्मले सर,पांडे (एरीकेशन कॉलनी) गायकवाड (एरीकेशन कॉलनी) 
देविदास गुहाडे,तुळशीराम अंभोरे, अशोक हजारे ,प्रकाश आगोसे,संजय अंभोरे,फकीरराव धनवे ,हरिभाऊ खोकले
संतोष मेटकर ,कल्याण बोंबले 
 भाऊराव पांडे,संजय व्यवहारे ,विलास पांडे 
संतोष मोरे ,अरूण बुरकुले विठ्ठल खुपसे,शुक्राजी रिठे ,योगीराज फोपसे
श्रीरंग निंबाळकर. सुभाष भरकाडे 
शंकर अंभोरे ,रंभाजी कबले अशोक ढोले 
ज्योतीबा बरगे. नामदेव गायकवाड 
कोंडबा झाडे , कुलदिप रिठे . रमेश मुरमुरे
नारायण दारसिंबे,प्रल्हाद फोले  सदाशिव वानोळे,के.एन.भिसे खोकले, शांतिदास ,विश्व नाथ पोटे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies