Type Here to Get Search Results !

शिवसेनेचा पालकमंत्री आघाडी धर्म पाळत नाही, माणिकरावांची वडेट्टीवारांकडे तक्रार; आघाडीत धुसफूस?

शिवसेनेचा पालकमंत्री आघाडी धर्म पाळत नाही, माणिकरावांची वडेट्टीवारांकडे तक्रार; आघाडीत धुसफूस?

शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीवर टीका केल्याने आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर


यवतमाळ : शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीवर टीका केल्याने आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली. हे प्रकरण ताजे असतानाच आता काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी थेट राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे यवतमाळचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्याविरोधात तक्रार केली आहे.शिवसेनेचे पालकमंत्री आघाडीचा धर्म पाळत नसल्याची तक्रार ठाकरे यांनी वडेट्टीवारांकडे केली आहे. त्यामुळे आघाडीत शिवसेनेची राष्ट्रवादी विरोधात तर काँग्रेसची शिवसेनेविरोधात नाराजी असल्याचे उघड झाले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना काँग्रेसला सापत्न वागणूक देत आहे. जिल्ह्यात शिवसेनेचा एकच आमदार आहे. काँग्रेसचे प्राबल्य अधिक आहे. तरीही या मतदारसंघात शिवसेनेचा धुडगूस सुरू आहे. जिल्हास्तरीय समित्यांमध्ये काँग्रेसला योग्य स्थान दिले जात नाही. तसेच शिवसेनेचे पालकमंत्री आघाडी धर्म पाळत नाहीत. त्यामुळेच माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसचे जिल्ह्याचे संपर्क मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे शिवसेनेच्या पालकमंत्री आणि आमदाराची तक्रार केली आहे. काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत माणिकराव ठाकरे बोलत होते. धुसफूस नाही
शिवसेना जिल्ह्यातील सर्व समित्यांवर वर्चस्व ठेवताना दिसत आहे. त्याची जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यानेच थेट मंत्र्याकडे तक्रार केल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, आघाडीत धुसफूस असल्याचे वृत्त वडेट्टीवार यांनी फेटाळले आहे. आघाडीत धुसफूस नाही. दोन भाऊ असले तरी भांडणे होत असतात. येथे तीन पक्षांचे सरकार आहे. मागील सरकारमध्ये शिवेसना आणि भाजपमधील भांडणे आपण रोज पाहत होतो, असे वडेट्टीवार म्हणाले.

फॉर्म्युल्याप्रमाणे काम व्हावे
प्रत्येकजण आपला हक्क मागत असतो. म्हणूनच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची भेट घेऊन आघाडीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे समितीवरील नियुक्त्या करण्यात येतील. ज्या पक्षाचा पालकमंत्री त्यांना ६० टक्के तर इतरांना प्रत्येकी ४०टक्के असा फॉर्म्युला ठरलेला आहे. तसेच मतदारसंघ निहाय ज्या पक्षाचा आमदार आहे त्यांना ६०टक्के आणि इतरांना २०-२० टक्के पदे, असा फॉर्म्युला ठरलेला आहे. या फॉर्म्युल्यानुसार काम व्हावे, असे माणिकराव ठाकरेंनी सांगितले. याचा अर्थ आघाडीत धुसफूस आहे असा होत नाही, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात कमबॅक करणार
यवतमाळ जिल्हा हा काँग्रेसचा गड होता, हा गड परत मिळवण्यासाठी आता काँग्रेसने कंबर कसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. ग्रामीण भागापर्यंत आढावा बैठक. मेळाव्यातून कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकही आमदार नसलेली काँग्रेस आगामी दिवसात काय चमत्कार घडवेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies