Type Here to Get Search Results !

बेलोरा येथील शिक्षकाचा मुलीवर लैंगिक अत्याचार यवतमाळ येथील घटना

बेलोरा येथील शिक्षकाचा मुलीवर लैंगिक अत्याचार

     यवतमाळ जिल्ह्यातील घटना

यवतमाळ -:बेलोरा येथे जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेवर  मागील ५ वर्षेपासून शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षकाने वर्गातील विद्यार्थीनी सोबत  गैरवर्तन सुरू असलल्याचा संशय ग्रामस्थांना होता. शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासेल असे कृत्य शाळेच्या वर्ग खोलीत केले. अरुण राठोड (५०) असे या शिक्षकाचे नाव आहे. तो ५ ते ७ ला शिकवत होता. परंतु कोरोना काळात शाळा बंद असल्याने १० व्या वर्गातील ७ ते ८ मुलींचे क्लासेस घ्यायचा. त्या निमित्याने नेहमी मुलींना शाळेत बोलवायचा त्यातीलच एका मुलीचे तो नेहमी लैंगिक शोषण करायचा. गावातील काही मुलांनी ही बाब प्रत्यक्षात पाहल्यानंतर गावात जाऊन सांगितली. लगेच गावातील नागरिक घटनेच्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन शिक्षकाला बेदम चोप दिला.
तसेच त्याची मोटर सायकल सुद्धा रागाच्या  भरात नागरिकांनी पेटवून दिली. चोप दिल्यानंतर ग्रामीणचे ठाणेदार किशोर जुनघरे व पोलीस उपनिरीक्षक पवार व ५ ते ७ पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असताना सुद्धा गावकऱ्यांचा संताप अनावर होऊन आरोपीला पोलिसां समोर मारहाण करण्याचा प्रयत्न करत होते.शेवटी पोलिसांना जमाव पागविण्यासाठी पिस्तुलचा धाक दाखवावा लागला व नंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले व
 आरोपी शिक्षकाला वैद्यकीय तपासणी साठी रूग्णालयात नेण्यात आले असुन पिडीत मुलीला आई-वडिलांच्या ताब्यात दिले. असुन
पिडीत मुलीच्या आई-वडीलाच्या तक्रारी वरुन  कलम ३७६बाललैंगिक अत्याचार नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षकास अटक केली असून
 याघटनेचा तपास पोलीस निरीक्षक किशोर जुनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies