मित्रांनीच केला मित्राचा घात!
पोलीस संशायित आरोपीच्या मागावर
प्रतिनिधी/पंकज नेहारे
आपल्या भारतीय संस्कृतीत नातेसंबंधाला खुप महत्त्व आहे. त्यातल्या त्यात मित्रत्वाच्या नात्याला तर अत्यंत पवित्र व विशेष मानले जाते. मैत्रीचे नाते बंधुत्वाचे व अतुट असते मात्र याच नात्याला कलंक लावल्याचा प्रकार मारेगाव तालुक्यातील घोडदरा शिवारात घटना घडली
मारेगाव तालुक्यातील घोडदरा शेत शिवारात २२वर्षीय तरूणाचा संशयास्पद प्रमोद रामपुरे रा. अर्जुनी या तरुणाचा मृतदेह घोडदरा शिवारात गजानन धनवे यांच्या शेतामध्ये दि.५ ऑगस्ट रोज रोजी गुरूवारला संशयास्पद आढळून आला असल्याची धोकादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना देण्यात आली होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होवून या घटनेचे तपासाची चक्रे फिरवीत हा मृतदेह प्रमोद नामदेव रामपुरे वय वर्षीय२२ रा. अर्जुनी याचा असल्याचे स्पष्ट झाले
देविदास नाना रामपुरे (२८),सत्यपाल वासुदेव रामपुरे (२९) रा.खेकडवाई असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. गजानन धवने रा.घोडदरा यांचे शेतीच्या पराटी मध्ये चिखलात प्रमोद चा मृतदेह आढळून आला.घटनास्थळी रक्त पडून मृतकाच्या तोंडाला फेस तसेच तोंडावर,कपाळावर,मानेवर व शरीरावर सुजन व जखमा कपडे अस्तावस्त होते व पायातील एक जोडा नव्हता.मात्र खुन करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. संबंधितां विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असुन संशायित आरोपी खेकडवाई येथून पोबारा केला असुन याघटनेचा अधिक तपास मारेगाव पोलीस स्टजशशचे ठाणेदार जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल चौधरी व पोलीस करत आहे.