Type Here to Get Search Results !

राज्यात ‘या’ तारखेनंतर पुन्हा कोसळणार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

राज्यात ‘या’ तारखेनंतर पुन्हा कोसळणार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने लावली होती हजेरी. पण सध्या जिल्ह्यांमध्ये पावसाने मारली दडी


मुंबई : राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. कारण, हवामान खात्याने १५ ऑगस्ट नंतर पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. राज्यात सर्वदूर पाऊस होणार, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. इतकेच नाही तर कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि यावेळी विदर्भ आणि मराठवाडामध्ये चांगला पाऊस होईल, असा हवामान खात्याने म्हटले आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, कोकण, विदर्भ आणि सर्वदूर भीषण परिस्थिती ओढावली होती. मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. पण सध्या जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस सुरू आहे. त्यातल्या त्यात काल आणि आज अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. तर येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये घाट परिसर असलेल्या ठिकाणीही मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. दरडी कोसळतील अशा ठिकाणावरून नागरिकांना तातडीने स्थलांतरित करावे, अशा सूचना हवामान खात्याकडून वारंवार देण्यात येत आहेत. येत्या आठवड्यात मात्र, पावसाची ओढ कायम राहील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, आज गुरुवारी पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. खरंतर, यंदाच्या पावसाचा विचार केला तर राज्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यांमध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आभाळ कोसळले तर काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे महापूर आला आणि या ठिकाणी शेतीच्या शेती वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले. त्यामुळे या सगळ्यातून दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांपुढे अशात वरूण राजा पुन्हा शेतकऱ्यांना साथ देणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies