Type Here to Get Search Results !

खेड नगरपरिषद हद्दीतील आदिवासी भवनासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी बिरसा क्रांती दल संघटनेची मागणी

खेड नगरपरिषद हद्दीतील आदिवासी भवनासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी बिरसा क्रांती दल संघटनेची मागणी

    प्रतिनिधी/आशिष आढळे

पुणे वार्ताहर-खेड नगरपरिषद हद्दीतील जागा आदिवासी भवनासाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी बिरसा क्रांती दल खेड तालुका संघटनेनी आज दि १२-०८-२०२१ रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद खेड यांना निवेदन देऊन केली आहे.खेड नगरपरिषद हद्दीत आदिवासी समाज्याची लोक संख्या १०ते १५ हजार आहे व खेड तालुक्यातील आदिवासी समाज्याची लोकसंख्या ही २०११च्या जणगणनेनुसार ६०ते ६५हजार आहे, सर्व शासकीय कार्यालय ही तालुक्याच्या ठिकाणी आहेत समाज्यातील माणसांना तालुक्याच्या ठिकाणी कामा निमित्त यावे लागते उशीर झाला तर परत जाण्याची गाडीची व राहण्याची सोय नसताना भवनमध्ये निवासी सोय उपलब्ध व्हावी व सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यासाठी किंवा सर्वाजनिरित्या एकत्र येण्यासाठी हक्काची अशी कुठेच जागा नाही तरी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी आपल्या नगरपरिषेद क्षेत्रात शासकीय ५ते६गु़ंठे जागा मिळवून दिल्यास त्या जागेवर समाजातर्फे वर्गणी काढून इमारत बांधण्यास (आदिवासी भवन)तयार आहोत.अशी मागणी बिरसा क्रांती दल खेड तालुका संघटनेनी निवेदन देऊन केली आहे या वेळी उपस्थित बिरसा क्रांती दल खेड तालुका अध्यक्ष मा सुधीर भोमाळे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मा हरिभाऊ तळपे कोषाध्यक्ष मा संतोष भांगे पुणे जिल्हा सचिव मा शशिकांत आढारी पुणे जिल्हा महासचिव मा किरण तळपे पुणे जिल्हा संघटक मा चिंधू आढळ खेड सदस्य राम गवारी उपाध्यक्ष मा कैलास मेठल संजय लोखंडे मा सुरेश भोकटे संघटक मा.आनंता मेठल दत्ता चौधरी, इत्यादी बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies