Type Here to Get Search Results !

नगरसेवकासह पाच जण हद्दपार..

भुसावळात नगरसेवकासह पाच जण हद्दपार..


भुसावळ शहरातील नगरसेवक राजकुमार खरातसह चौघांविरुद्ध जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षे हद्दपार केल्या बाबतचे आदेश प्राप्त झाले असून त्यांना हद्दपार आदेश बजावणी करण्यात आली आहे.
शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अग्निशस्त्र व घातक शस्त्र ,खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे तसेच दरोड्याचे साहित्यसह, दरोड्याचीे तयारी, गैरकायदा मंडळी जमवून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देऊन दुखापत करणे, नुकसान करणे तसेच भुसावळ शहरातील नागरिकांवर दहशत निर्माण करून वेळ प्रसंगी त्यांना प्राणघातक हत्याराव्दारे गंभीर दुखापती करून जबरी चोरी करून अवैध मार्गाने मिळविलेल्या पैशांवर दारू पिऊन मौजमजा करून लोकांमध्ये दहशत निर्माण करतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हा त्यांचे स्वतःचे व कुटूंबाचे जीविताचे भीतीने त्यांचेविरुद्ध उघडपणे तक्रार देण्यास धजावत नाहीत.


तसेच हद्दपार टोळी प्रमुख व टोळी सदस्य हे गुन्हेगारी वृत्तीचे असून ते रेकॉडवरील गुन्हेगार असून व गुंड व खुनशी प्रवृत्तीचे आहेत. त्यांची गुन्हेगारी पाश्वभूमी पाहता भुसावळ शहरातील लोकांचे जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण झाला असल्याने त्यांचे वर्तणूक ही सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बाधा निर्माण करणारे  आतिष रविंद्र खरात (वय २५, रा. समता नगर भुसावळ) , राजकुमार उर्फे सनी रविंद्र खरात (वय २७, रा.  समता नगर भुसावळ,  हंसराज रविंद्र खरात (वय १९, रा. समता नगर भुसावळ), राजन उर्फ गोलू रविंद्र खरात (वय २२, रा. समता नगर भुसावळ), अमोल उर्फे चिन्ना श्याम खिल्लारे (वय २५, रा. देशमुखवाडी रेल्वे आर.बी.सेकंड न्यू वॉटर टँक हनुमान मंदिर जवळ अकोला ह.मु.समता नगर भुसावळ)  यांना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षे हद्दपार केल्या बाबतचे आदेश प्राप्त झाले. त्यांना हद्दपार आदेश बजावणी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies