आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचार आरोपीला अटक
चिखलदऱ्याच्या भीलखेडा येथील घटना
चिखलदरा अंतर्गत येणारा गाव भिलखेडा येथिल ८ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार पिडित मुलीचे आई वडील सकाळच्या सुमारास शेतात कामावर गेले असता घरी पडित मुलीची आजी मोठी बहीण लहान भाऊ व पिडीत मुलगी आपल्या राहत्या घरी होते. दि. १४/८/२०२१ ला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पिडीतचे आई बाबा शेतातून घरी आले असता पिडीत मुलगी आपल्या आई बाबा समोर रडत होती. व तिला बरोबर चालत येत नव्हते. आई बाबा ने विचारणा केली असता संध्याकाळी ४ वाजताच्या दरम्यान पिडीत मुलगी संडासला गेली असता आरोपी अरुन डेबा भुसूम वय २८ हा आला व पिडीत मुलगी वर जबरदस्ती करून तिच्या वर लैंगिक अत्याचार केला. व कुणाला सांगितल्यास जिवंत मारण्याची धमकी दिली. व पिडीत मुलीच्या लघवीच्या जागे मध्ये त्रास झाल्यामुळे तिला चालत येत नव्हते असे पिडीत मुलीने आपल्या आई बाबा जवळ सागितले.
त्यानंतर या घटनेची माहिती पिडीत मुलीच्या आई बाबा ने गावातील पोलीस पाटीलला दिली असता. पोलीस पाटीलाने भिलखेडा गावात ८ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला असल्याची माहिती चिखलदरा पोलीस ठाणेला कळविले.
चिखलदरा पोलीस ठाण्यात माहिती मिळताच भिलखेडा गावात जावून चौकशी केली असता पिडीत मुलीच्या आई बाबा च्या तक्रारीवरून आरोपी अरुण डेबा विरुध्द कलम ३७६,अब ५०७,भादवि कलमसह ४ पोस्को असा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अरुण डेबा भुसूम दि. १५/८/२०२१ ला अटक करण्यात आली आहे.
पिडीत मुलगी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे भरती असुन तिचे बयान नोंदणे बाकी आहे. असल्याचे येथिल ठाणेदार राहूल वाढवे यांनी सांगितले आहे.
तसेच चिखलदरा येथील ठाणेदार राहूल वाढवे यांच्या नेतृत्वाखाली ASI सुरेश राठोड, चत्रिया ठाकरे, निलेश काळे, अमोल गायकवाड, आशिष वरघड, सय्यद इम्तियाज पुढील तपास करीत आहेत.